हुलफली
साहित्य 5 कांदे 1वाटी शेंगदाणे अर्धी वाटी बेसन पीठ चिंच (सुकलेली) साखर एक चमचा हिरवी मिरची ठेचा (चवीपुरतं) मीठ (चवीनुसार) फोडणीसाठी- तेल,मोहरी, जीरे,कडीपत्ता कृती फोडणी करावी- तेल,मोहरी, जीरे,कडीपत्ता ,त्यात कांदे मोठे चिरून टाकावे नंतर शेंगदाणे मोठे वाटून टाकावे,शेंगदाणे आणि कांदे तळत आले की त्यात हिरवी मिरचीचा ठेचा टाकावा, चिंच भिजवून त्याचे पाणी फोडणीत घाला मग त्यात अर्धा लिटर पाणी टाकावे,(बेसन पीठ एका वाटीत घेऊन त्यात थोडा पाणी टाकावे त्याचा मिश्रण बनून घ्या) पाण्याला उकळी आली की त्यात बेसन पिठाच मिश्रण टाका. एक चमचा साखर घालून 5 मिनिट शिजवावे. भाकरी किंवा भात सोबत खावे.